नात्याला काळीमा! मुलांकडून आईचं काळीज काढून क्रूर खून

कोल्हापूर – रक्ताच्या थारोळ्यात पडलेली वृद्ध महिला… आणि परातीत ठेललेंलं तीचं काळीज पाहून कुणालाही पटणार नाही की तीचा इतक्‍या निघृणपणे खून तीच्या पोटच्या मुलानेच केला असावा. दारूच्या नशेत स्व:च्या आईचा खून करून तीचे काळीज बाहेर काढून ठेवणाऱ्या नराधम मुलाला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कोल्हापूरातील ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

अधिक माहिती अशी की, कोल्हापूरातील ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीमधील सुनिल कुचकोरवी याने आज दुपारी अतीमद्य प्राशन केलं. त्यानंतर त्याने घरा शेजारी असणा-या शेजा-यांच्या घरात जावून भुकलागल्याने जेवण मागीतलं, या वेळी त्यानी तो दारुच्या नशेत असल्याने त्याला घराबाहेर काढलं. नशेत तर्ररररर असणारा सुनिल त्या नंतर आपल्या घरात शिरला. या वेळी घरातील 65 वर्षीय वृद्ध आई यलव्वा रामा कुचकोरवी हिच्या सोबत वाद घातला. या वेळी सुनिलं ने घरातील टिव्ही लावून नशेच्या नादादत त्याने हत्याराने आईच्या छातीवर वार करत तीचं काळीजच बाहेर काढलं. त्याच आवस्थेत त्याने आईचं काळीज आणि आतड्या एका परातीत ठेवल्या. रक्ताळलेले हात तीच्याच साडीला पुसत तो घरा बाहेर पडला.

ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांनी सुनिलाला पकडून ठेवलं. तसेच याची माहीती त्यांनी शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी नशेत तर्रररर असणा-या सुनिलाल ताब्यात घेतलं. सुनिलंन दारुच्या नशेत आपल्या आईचं काळीज काढून त्याला तिखट मिठ लावून खाल्याची चर्चा या परिसरात नागरीक दबक्‍या आवाजात करत होते, मात्र याला पोलिसांनी अद्यापही दुजोरा दिला नाही. आरोपी सुनिल हा सेंट्रींगचे काम करत असून, त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी आणि मुले मुंबईला राहायला गेले आहेत. या घटने बाबात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)