नात्यातील 14 वर्षाच्या मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्याला सक्तमजुरी

अतिरिक्त सत्र न्यायधीश एस.के.कऱ्हाडे यांचा आदेश


दीड हजार रुपये दंडही सुनावला
 

पुणे – प्रेमसंबंध का ठेवत नाही, अशी विचारणा करत शाळेला निघालेल्या नात्यातील 14 वर्षाच्या मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के. कऱ्हाडे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 1 महिना कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

रवींद्र दत्तु जगताप (वय 21, रा. चांदखेड, ता. मावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामधे पीडित मुलगी, तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. ही घटना 28 नोव्हेंबर 2015 च्या पूर्वीच्या दीड महिन्याचा कालावधीत घडली. पीडित मुलीचे आई-वडिल विभक्त राहतात. ती आईसोबत गहुंजे येथे राहते. घटनेच्या वेळी ती शिवाजी विद्यालय देहुरोड येथे आठवीत शिकत होती. ती शाळेला पायी जात-येत असत. शाळेला जाताना “तु माझेशी लग्न केले नाही, तर तुला, तुझ्या आईला बघुन घेतो’ असे म्हणत रवींद्र याने तिचा विनयभंग केला. प्रेमसंबंध का ठेवत नाही, अशी विचारणा केली. याबाबत पीडितेने आईला सांगितले. त्यावेळी आईने रवींद्र याला जाब विचारला. त्यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 8, धमकावणे नुसार दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने भादवी कलम 354 (विनयभंग) नुसार 3 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, तर भादवी कलम 506 (धमकाविणे) नुसार 3 महिने कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)