पत्नीसोबतचे भांडण सोडविण्यासाठी गेल्याने केला खून

पुणे: पती – पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नातेवाईक महिलेचा खून केल्याप्रकरणात एकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी हा आदेश दिला आहे. हिरा देवू चव्हाण (वय 30, रा. लमाण तांडा, संजय गांधी वस्ती, पाषाण), असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. ही घटना दि. 17 मे रोजी सायंकाळी 7.45 बावधन, भुंडे वस्ती परिसरात घडली. हिरा हा पत्नी लक्ष्मी यांना मारहाण करीत होता. त्यामुळे नात्यातील मुन्नीभाई देवा जाधव (वय 25, रा. भुंडे वस्ती, पाषाण, मूळ. कर्नाटक) या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या डाव्या गालाच्या खाली लोखंडी फुंकणी फेकून मारली. त्याचवेळी हिरा याने त्यांना ढकलून दिले. त्यामुळे गालाला आणि डोक्‍याला मारहाण लागून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्यांचे पती देवा (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी हिरा याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात असून, तो बालसुधारगृहात आहे. हिरा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल आहे. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. जामीन दिल्यास तो फरार होण्याची अथवा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्‍तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)