नाणे मावळातील योग प्रशिक्षण शिबिराची सांगता

उत्तम आरोग्यासाठी योगातील सातत्य महत्वाचे
नाणे मावळ – मानवी जीवन आरोग्यसंपन्न जगण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी टाटा पॉवर कंपनी, लोणावळा आणि गोल्डन ग्लेड्‌स एज्युकेशन सोसायटी करंजगाव यांच्या वतीने करंजगावच्या माध्यमिक विद्यालयात मोफत योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाले.

सकाळी आठ ते बारा दरम्यान दोन सत्रात पुरुष व महिलांसाठी हे मोफत मार्गदर्शन करण्यात आले. मोफत योग प्रशिक्षण शिबिरासाठी योगाचार्य दिनेश कुमार सिंग व योगा शिक्षिका सपना आगरवाल यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच योगाचे महत्त्व पटवून दिले.

नाणे मावळातील नागरिकांनीसुद्धा मोफत योग प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून योग प्रशिक्षण घेऊन आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी शिबिरात सहभागी झाले. टाटा पॉवरचे गंगाधर के. बी. आणि गोल्डन ग्लेड्‌स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शिवाजीराव टाकवे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उत्तम आरोग्यासाठी योगातील सातत्य महत्त्वाचे आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्‍त केले. योग प्रशिक्षण शिबिरासाठी नाणे मावळातील कांबरे, कोंडीवडे, करंजगाव, गोवित्री, सांगिसे, खांडशी, नेसावे आदी गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने करंजगावचे सरपंच उर्मिला शेलार, माजी सरपंच तानाजी पोटफोडे, कांबरे गावचे माजी सरपंच साईनाथ गायकवाड पाटील, काशिनाथ मोरमारे आदी उपस्थित होते. तीन दिवसीय शिबिरामध्ये महिलांची उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूराव नवले, टाटा पॉवरचे व्यवस्थापक अतुल करवटकर, खांडशी गावचे माजी सरपंच सखाराम कुंभार यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)