नाणेघाट ते चाळकवाडी साहित्य दिंडी उत्साहात

शिवनेरी- चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे शिवांजली साहित्य पीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी यांच्या वतीने बुधवारी (दि. 27) मराठी भाषा दिनानिमित्त सैनिक अभिवादन साहित्य संमेलन झाले. या संमेलनात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना एक आगळी वेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
नाणेघाटातील मराठी भाषेचे मूळ असलेल्या शिलालेखाचे पूजन एकनाथ महाराज रावळ आणि न्यू इंग्लिश स्कूल आंबोलीचे मुख्याध्यापक संजय वाघ यांनी केले. त्यानंतर नाणेघाट ते चाळकवाडी साहित्य दिंडी आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यानंतर सैनिकांवरील कवितांच अभिवाचन सादर करण्यात आले. त्यानंतर सैन्यदलात सेवा केलेले भूमीपुत्र वसंत सोनवणे, संजय सोनवणे, नामदेव सोनवणे आणि सावळेराम चौधरी
यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास शिवाजीराव चाळक, देविदास इंदापवार, नंदकुमार पाडेकर, अशोक सोनवणे, एकनाथ महाराज रावळ, प्रा. संजय वाकचौरे, डॉ. दुष्यंत गायकवाड, रवी काशीद, शिवांजलीचे मुख्याध्यापक बी. आर. चासकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर डोंगरे यांनी केले, तर सुत्रसंचालन बाबासाहेब जाधव आणि गणेश कोंडे यांनी केले, तर शिवाजीराव चाळक यांनीआभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)