नाणेकरवाडी शाळेचे क्रीडा महोत्सवात यश

चिंबळी- चाकण येथे कुरुळी केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडीने घवघवीत यश मिळविल्याचे मुख्याध्यापिका आशा चव्हाण यांनी सांगितले. चाकण बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा भोसे येथे पार पडल्या. वैयक्‍तीक गटात शिवानी साकेत हिने उंच उडीत प्रथम, तर सांघीक लेझीम गटात मुलींच्या लहान व मोठ्या गटातील गटात नाणेकरवाडी शाळेने प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. मागील वर्षीही जिल्ह्यात लेझीममध्ये प्रथम क्रमांक मुलींनी मिळवला होता. या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कुरुळी केंद्राचे केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर, आदर्श शिक्षक अरुण गायकवाड, सरपंच शरद नाणेकर, उपसरपंच अर्चना नाणेकर, शाळा व्यावस्थापन अध्यक्ष संजय जाधव, शशिकांत नाणेकर ,सिद्धेश नाणेकर, शाळा व्यावस्थापन समिती सदस्य संदिप नाणेकर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)