नाणेकरवाडीत विविध विकासकामांचे भूमिपूजन

चिंबळी- नाणेकरवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालय, मुकेशभाई माझिशिया सांस्कृतिक हॉलचे उद्‌घाटन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्या रूपाली कड, पंचायत समिती सदस्या वैशाली जाधव, गटशिक्षिण अधिकारी संजय नाईकरे, विस्तार अधिकारी गौतम कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच शरद नाणेकर, उपसरपंच अर्चना नाणेकर, राहुल नाणेकर, संदीप नाणेकर, दिपा नाणेकर आदि मान्यवरांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दत्तात्रय शिवले तर संजय जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)