नाणेकरवाडीत विनापरवाना जुगार अड्ड्यावर छापा; तिघे ताब्यात

वाकी- लोकांकडून पैसे घेवून संगनमताने बेकायदा बिगरपरवाना जुगार अड्डा चालवणाऱ्या अड्ड्यावर चाकण पोलिसांनी छापा मारून तिघांना ताब्यात घेवून त्यांच्यवार गुन्हा दाखल केला आहे.नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत आज(मंगळवारी) सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.
जितेश कैलास शिंदे (वय 30, रा. चाकण, ता. खेड), राजू सुभाष दिनकर (वय 28) व अमोल गौतम खंडागळे (वय 32, दोघे रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पोलीस हवालदार नवनाथ महादेव खेडकर (वय 36, रा. चाकण, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. नाणेकरवाडी गावच्या हद्दीतील भाजी मंडईलगत रस्त्याच्याकडेला तिघेजण बेकायदा विनापरवाना जुगार खेळवून लोकांकडून पैसे घेवून जुगार चालवित होते. याची कुणकुण येथील पोलिसांना त्यांच्या गुप्त खबऱ्याकडून मिळताच पोलिसांनी आज सकाळी सापळा लावून जुगार अड्ड्यावर मारलेल्या छाप्यात तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुश्‍ताक शेख, सुभाष पवार व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)