नाणेकरवाडीत रोहित्राचा स्फोट; ठिणग्यांनी टेम्पो खाक

वाकी- महावितरणच्या रोहित्राचा अचानक स्फोट झाल्याने त्यात्यून उडालेल्या ठिणगांमुळे रोहित्राजवळील एक टेम्पो आगीत जळून खाक झाला. हा प्रकार नाणेकरवाडी हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गावरील कन्या प्रशालेच्या समोर सोमवारी 9दि. 26) रात्री उशिरा घडला. पाण्याचा प्रचंड मारा करून तब्बल दीड तासांच्या अथक परिश्रमातून ही आग आटोक्‍यात आणण्यात आली. या आगीत टेम्पोचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अमोल ज्ञानदेव गडाख (वय 31, रा. मोशी, ता.हवेली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादित नमूद केले आहे की, गडाख यांचा टेम्पो टेम्पोचालक सुरेश मलघे याने टेम्पो (एमएच 14, एएल 3843) हा पुणे – नाशिक महामार्गावरील एका कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उभा केला होता. त्यानंतर चालक मलघे हे काही कामानिमित्त संबंधित कंपनीत गेला. कंपनीत आत गेल्यानंतर त्यांना टेम्पो लगत असलेल्या रोहित्रात तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाला आणि त्या रोहित्रातील ठिणग्या टेम्पोच्या केबिनवर पडून आतील कापसाच्या कुशनने पेट घेतला. त्यानंतर महामार्गावरील प्रवाशांनी व या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा प्रचंड मारा करून टेम्पोला लागलेली ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने बराच वेळ प्रयत्न करूनही आग आटोक्‍यात येत नव्हती. तोपर्यंत या आगीत टेम्पोचा समोरील संपूर्ण भाग जळून खाक झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून, टेम्पोचे एकूण दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत चाकण पोलिसांना कळवताच येथील पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुश्‍ताक शेख, सुभाष पवार व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)