नाणार विरोधी कृती समिती दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला

मुंबई/नवी दिल्ली : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला राजकीय पक्षांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. नाणार विरोधी कृती समितीने नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. नाणारला शिष्टमंडळ पाठवणार असल्याचे राहुल गाधी यांनी स्पष्ट केले. आम्ही नाणारवासियांच्या पाठीशी असल्याची हमीही त्यांनी यावेळी दिली.

नाणारमध्ये उभ्या राहणाऱ्या ग्रीन रिफायनरीला भूमीपुत्रांचा जोरदार विरोध आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा धोक्यात येईल असा आरोप होत आहे. शिवसेनेने यापूर्वीच भाजपला विरोध करत नाणार प्रकल्प उभा करण्यास नापसंती दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेसनेही या प्रश्नात उडी घेतली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)