नाणार प्रकल्प होऊ दिला जाणार नाही

       मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका

मुंबई – नाणारचा प्रकल्प कोकणामध्ये होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्‍त केली आहे. नाणारमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. प्रकल्प होणार हे लक्षात आल्यावर घेऊन ठेवलेल्या या जमिनींसाठी दलाली सुरू आहे. प्रकल्प आणण्यापूर्वीच ही दलाली सुरू झाली असते. विकास प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातमध्ये लगेच नेला जाईल. प्रकल्पातून कोकणवासियांचे भले होणार नसल्याने हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. मनसेच्यावतीने महिलांन ई रिक्षा वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

बलात्कार करणाऱ्या आरोपींना जात, धर्म न बघता देहदंडाची शिक्षा द्यायला हवी. अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्‍त केली. कठुआ बलात्कार प्रकरणावरून ठाकरे यांनी केंद्रातील भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपल्याला भ्रमनिरास झाला आहे. प्रसार माध्यमांना धमकावले जात आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान विकास कामांबाबत खोटी माहिती देत आहेत. महाराष्ट्राचे वाळवंटीकरण होत आहे. मराठवाड्यातील पाणी पातळी खालावली आहे. पण मुख्यमंत्र्यांकडून त्याबाबत दिशाभूल केली जात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुंबईत भाजी विक्रीसाठी शिवसेनेकडूनच अटकाव केला जातो. यावरही ठाकरे यांनी टीका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)