नाणार प्रकल्प हे कोकणचे “गॅस चेंबर’

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या मुखपत्रातून भाजपवर टिका
मुंबई – कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. तसा प्रयत्न कराल तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू, हा आमचा शब्द आहे. नाणारचा प्रकल्प हे जहर आहे. तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे. नाणार’ हे कोकणचे गॅस चेंबर’ होईल म्हणून आमचा विरोध आहे आणि राहणार, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मुखपत्रातून म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी फक्त केंद्रातलेच नव्हे तर राज्याराज्यांतील पर्यावरण खाती आता कायमचीच बंद करायला हवीत. पर्यावरण स्वयंसेवकांनी, जनतेने निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी मर मर मरायचे आणि केंद्रातील उपटसुंभांनी पर्यावरणाचा खून करणारे विषारी रासायनिक प्रकल्प जनतेच्या छाताडावर आणायचे. त्यामुळे “पर्यावरण प्रेम’ हे एक ढोंगच ठरले आहे. कोकणातील स्वच्छ हवा आणि पाण्याचे विषात रूपांतर करणाऱ्या प्रकल्पास जनतेचा विरोध असतानाही तो लादला जात असेल, जनतेचा विरोध पायदळी तुडवला जात असेल तर ही आणीबाणी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी-फडणवीस सरकारची हुकूमशाही आहे. अशी हुकूमशाहीच करायची असेल तर या मंडळींचे आणीबाणीच्या विरोधात 43 वर्षे बोंबलण्याचे सर्व ढोंगच होते. देशाचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हे दिल्लीत बसून त्या नाणार प्रकल्पाच्या रिफायनरीबाबत सामंजस्य करार करतात व नंतर समर्थनासाठी मुंबईकडे धावतात. हा विश्वासघात आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री भेटणार
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल रिफायनरीला शिवसेनेचा असलेला विरोध दूर करण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राग शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीत नाणार प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज, आक्षेप दूर करून ठाकरे यांचे मन वळविण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न राहणार आहे. यासंदर्भात समिती नेमली जाण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)