नाणार प्रकल्प कोणावरही लादणार नाही : मुख्यमंत्री

नागपूर : नागपुरातील पावसाळी अधिवेशनात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने रान उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिले. विरोध होत असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

“समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला, पण आम्ही चर्चेने प्रश्न सोडवला. आता 93 टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. नाणार प्रकल्पाबाबत विविध पक्षांसोबत चर्चा करण्याची तसंच नागरिकांना समजावण्याची आमची तयारी आहे. सर्व बाबी पटवल्यानंतरच आम्ही पुढे जाणार आहोत. सगळ्यांच्या शंकांचे निरसन करु. मी नाणार प्रेझेन्टेशन देणार आहे. पण नाणार प्रकल्प कोणावरही लादणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“पर्यावरणाच्या बाबतीत सिंगापूर जगातील सर्वात सजग देश आहे. त्यांनीही कोस्टल रिफायनरीला परवानगी दिली. त्याच धर्तीवर ही रिफायनरी तयार करण्याचा सरकाराने विचार केला. त्यानुसार जागा शोधली, समितीने सर्व्हे करुन कामाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर नव्याने विरोध सुरु झाला. एकीकडे आंदोलन सुरु झालं आणि दुसरीकडे जमीन अधिग्रहणाला परवानग्या दिल्या,” असेही देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)