नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे आक्रमक; पेट्रोलियममंत्र्यांसोबतची भेट नाकारली

मुंबई : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहेत. कारण, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला आहे. नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी उद्या उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली होती. करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भेटीचा प्रस्ताव फेटाळला आहे.

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाची बैठकतही नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला. नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतले नसल्याची तक्रारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर दुसरीकडे, नाणार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. नाणारबाबत सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींचा सामंजस्य करार सोमवारी झाला. दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. माध्यमांतूनच मला माहिती मिळाली. याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. केंद्र सरकारमध्ये अनंत गीते हे आमचे मंत्री आहेत. त्यांनाही याची कोणतीही कल्पना दिली गेली नाही, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)