‘नाणार’चे आंदोलन म्हणजे भाजप-शिवसेनेचे मॅच फिक्सिंग : विखे-पाटील

मुंबई : ‘कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरु असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपशी केलेल्या एका ‘डिल’चा भाग असून, हे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे.’ अशी  टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

‘मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे. परंतु, हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप माथी यायला नको म्हणून भाजपने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनितीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपने सुरुवातीला या प्रकल्पाची रदबदली करुन काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा.’ असा आरोप विखे पाटील यांनी केला.

‘या प्रकरणामध्ये भाजप-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. एकीकडे शिवसेनेचे उद्योग मंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात. तर दुसरीकडे भाजपचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते.’ असं म्हणत विखे-पाटलांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)