नाट्यमय घडामोडीनंतर बारामतीतील उपोषण मागे

बारामती- शहरातील व्यावसायिक गाळ्यांच्या मुद्यावरुन भाजपचे सुरेंद्र जवरे यांनी सुरू केलेल्या चक्री उपोषणासमोरच गाळेधारक संघटना व राष्ट्रवादीने शुक्रवारी (दि. 23) टाळ-मृंदगाच्या गजरात धरणे आंदोलन सुरू केले. काही गाळेधारकांनी गाळे बंद ठेवत धरणे आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाच्या निमित्ताने भाजप व राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी एक बैठक घेत याप्रश्‍नी तोडगा काढल्यानंतर भाजपने चक्री तर गाळेधारक-राष्ट्रवादीने धरणे आंदोलन मागे घेतले.
बारामती शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या उद्योगभवनांनमधील व्यावसायिक गाळे व्यापारी वर्गासाठी लिलाव पद्धतीने खुले करण्यात यावेत, पत्रकार संघासाठी बांधण्यात आलेले पत्रकार भवन संघासाठी देण्यात यावे, तसेच व्यावसायिक गाळ्यांमध्ये भाडे पद्धतीतील असमानता दूर करवी या व इतर मागण्यांसाठी भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी गुढीपाडव्यापासून (दि. 18) नगरपरिषदेसमोर चक्री उपोषण सुरू केले होते. तर नगरपरिषदेसमोर काळी गुढीही उभारली होती. यावर गुरुवारी (दि. 22) भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. तर गाळेधारक-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जेवरे यांच्या उपोषणस्थळासमोरच धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनातून उठून थेट जेवरे यांच्या व्यासपीठावर जात त्यांना बुक्का लावून हार घालत जेवरे यांना सद्‌बुद्धी देण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी व भाजपमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. अखेर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेत पालिकेत बैठक घेतली. यावेळी रिकाम्या गळ्यांबाबत भाडेनिश्‍चिती करून त्याचा लिलाव केला जाईल. तसेच प्रशासनाची चेष्टा खपवून घेणार नाही, पुढे काही घडले तर माझे वेगळे रुप पाहायला मिळेल असा सज्जड दम भरत बैठकीत जादा बोलणाऱ्यांना प्रांताधिकारी निमक यांनी जोरदार झापले. यानंतर दोन्ही पक्षांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली, त्यानुसार दोन्ही पक्षांनी आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी मुख्याधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते.

  • प्रशासनाची नमती भूमिका
    पत्रकार भवन पत्रकार संघासाठी त्वरीत देणे, जुन्या कचेरीसमोरील उद्योग भवन व्यापाऱ्यांसाठी खुले करणे, श्रीगणेश भाजी मर्केटमधील गाळ्यांचा प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पठवणे, जगनाडे महाराज शॉपिंग सेंटर गाळ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्णय घेणे आदी विषयांवर समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आले. तर 15 दिवसांत याबाबत निर्णय घेतले जातील, असे आश्‍वासन यावेळी नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आले.
  • बंदला 100 टक्के प्रतिसाद
    विकासकामात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप करीत उपोषणकर्ते सुरेंद्र जेवरे यांच्या निषेधार्थ गाळेधारक व्यावसायिकांनी बारामती बंद ठेवली. यावेळी गाळेधारक संघटनेने पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद ठेऊन व्यावसायिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
    बारमती : भाजपचे सुरेंद्र जेवरे यांना सद्‌बुद्धि द्यावी, यासाठी गाळेधारक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आंदोलन केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)