नाट्यपदांनी निगडीकरांची दिवाळी पहाट सूरमयी

पिंपरी – वद जाऊ कुणाला शरण ग, घेई छंद मकरंद, प्रीतीचा हा कल्पतरू अशा एका सरस एक नाट्यपदांनी निगडीकरांची दिवाळी पहाट सूरमयी झाली.

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील मनोहर वाढोकर सभागृहात मुक्तिसोपान संगीत विद्यालयातर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. स्नेहल कोकीळ व स्नेहल मार्लेगावकर या मुक्तिसोपान विद्यालयातील गायन अध्यापिकांनी गायलेल्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अस्मिता चिंचाळकर यांनी सुरुवातीला संगीत शाकुंतल मधील पंचतुण्ड नररुंड मालधर ही नांदी सादर केली. गेली 20 वर्षे विविध संगीत नाटकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अस्मिता चिंचाळकर यांनी हसत खेळत, प्रेक्षकांशी संवाद साधत विविध नाट्यपदे सादर केली. एकेक नाट्यपद म्हणजे जणू छोटा ख्याल. हल्ली वेळेच्या बंधनामुळे जास्त वेळ ख्याल आळवता येत नाही. परंतु, आज दिवाळी पहाटच्या निमित्ताने मुक्तपणे नाट्यसंगीत गाण्याची संधी मिळाली आहे, असेही त्या म्हणाल्या.

संगीत सुवर्णतुला नाटकातील उजळत जग मंगलमय, संगीत स्वयंवर मधील रुक्‍मिणीच्या तोंडी असलेले सृजन कसा मनचोरी, कट्यार काळजात घुसली मधील उमाने गायलेले घेई छंद मकरंद, संगीत मानापमान मधील भामिनीने लटक्‍या रागाने म्हटलेले नाथा नाही मी बोलत, संगीत सौभद्र मधील वद जाऊ कुणाला शरण ग, संगीतकार यशवंत देव यांना आदरांजली म्हणून गायलेले संगीत बावनखणी मधील प्रीतीचा हा कल्पतरू या सर्वच पदांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. माऊलींच्या अवघाचि संसार या अभंगाने वातावरण भक्तिमय झाले. संगीत कान्होपात्रा मधील वैकुंठीच्या राया या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

या स्वरमैफिलीला माजी उपमहापौर राजू मिसाळ, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, ज्ञान प्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, उपप्रमुख मनोज देवळेकर, केंद्र व्यवस्थापक यशवंतराव लिमये, मुक्तिसोपानच्या संस्थापिका अलका शाळू, पालक महासंघाचे विलास खांडेकर, किशोर जाधव, नवनाथ नरळे आदी उपस्थित होते. मुक्तिसोपानच्या प्रमुख शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)