नाटक ‘सर सर सरला’ पुण्यात ; मकरंद देशपांडे, अहाना कुमरा करणार अभिनय

लेखक आणि निर्देशक मकरंद देशपांडे, अहाना कुमरा, संजय दाधीच आणि फैसल रशीद करणार अभिनय

पुणे: मकरंद देशपांडे द्वारा लिखित एक हिंदी नाटक ‘सर सर सरला’ बालगंधर्व रंग मंदिर येथे १२ अॉक्टोबर रोजी प्रस्तृत होत आहे. युवा आणि प्रसिद्ध कलाकरांनी सुस्सजित हे नाटक यावेळी एका नवीन कथेसोबत प्रदर्शित होणार आहे.

रंगमंचावर एक विशेष ख्याती प्राप्त केलेले लेखक आणि निर्देशक मकरंद देशपांडे आणि प्रसिद्ध चित्रपट ‘लिपस्टिक अंडर माई बुर्खा’ ची अभिनेत्री अहाना कुमरा ह्या नाटकामध्ये अभिनय करणार आहेत. याशिवाय ‘एमएस धोनी’ आणि ‘तारे जमीन पर’ चे कलाकार संजय दाधीच आणि रावण, ल्यूसिड आणि डिशूमसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले फैसल रशीद देखील या नाटका मध्ये अभिनय करणार आहेत.

सर सर सारला दोन भागांत विभागलेले आहे, ते प्रोफेसर पालेकर आणि त्यांचे दोन शिष्य सरला आणि फणिंदर यांच्या परस्परसंबंधांची कथा सांगते. हे नाटक नात्यांचे महत्व आणि जीवनातील चढ-उतारांचा सामना कसा करावा हे समजवते. तसेच हे भावना आणि मनोरंजनाच एक अद्वितीय संयोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)