नाजूक, सुंदर मनगटासाठी…

व्यक्तिमत्व सौंदर्यासाठी आपण चेहरा, मान व हातांविषयी जागरुक राहता. मात्र मनगटांकडे लक्ष देत नाहीत. प्रत्यक्षात, मनगटांमुळेही व्यक्तिमत्व सौंदर्यात प्रभाव पडतो. बांगड्या घालताना, मेंदी लावताना, घड्याळ पाहून वेळ सांगताना इतरांचं लक्ष तुमच्या मनगटाकडे जातच. हाडं निघालेली, शिरा दिसणारी मनगटं जशी चांगली दिसत नाहीत तसेच त्यावरील विविध दागिनेही खुलत नाहीत.

गोल नाजूक मनगट सुंदर समजलं जातं. हातांच्या सौंदर्यात मनगटांचा मोठा वाटा असतो. मनगटाची रचना नैसर्गिक असते हे खरं असलं तरी कधी कधी विविध कारणांनी म्हणजे खूप जड वस्तू सतत उचलणे, दळण, कांडण खूप करणे, घट्ट दागिने घालणे, सतत हाताला घड्याळ बांधणे इ. मुळे मनगटांचं सौंदर्य कमी होतं.

मित्रांकडून मस्करीत सतत मनगट मोडण्याने (बोटं मोडल्याप्रमाणे) वा शरीरातील तकाकी इ. च्या कमतरतेमुळे मनगटांचं सौंदर्य नाहीसं होतं. काही स्त्रियांची मनगटं मुळातच इतकी सुंदर असतात की त्यांना त्यासाठी काहीच करावं लागत नाही. पण ज्यांची तशी स्थिती नाही अशा स्त्रियांनी खालील उपाय अमलात आणले तर त्या आपल्या मनगटाचं सौंदर्य वाढवू शकतात.

 

रोज अंघोळीपूर्वी थोडा वेळ तेलाने मनगटाचं मालीश करा.


सतत वजनदार वस्तू उचलण्या ठेवण्याचं टाळा.


शरीरातील रक्त कमी होऊ देऊ नका. त्यासाठी पुरेसं प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स व कॅलशियमयुक्त जेवण घ्या.


मनगटावर घट्ट दागिने वापरु नका. तसेच घड्याळ जास्त घट्ट घालू नका. कारण त्यामुळे रक्तप्रवाह कुंठित होऊन मनगट निर्जीव दिसू लागतं.


मनगट निमुळतं, मुलायम राहावं यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं तेल, लिंबाचा रस व मध यांचं मिश्रण करुन ते मनगटावर मळा.


मनगटावरील तरारलेल्या शिरांवर आठवड्यातून एकदा मध, केळं व मुलतानी मातीचं पॅक लावा. काही आठवडे सातत्याने हा प्रयोग केल्यास मनगटाचं सौंदर्य खुलेल.


कधी कधी मनगटाला पिकलेली पपई लावा. वाळल्यावर धुऊन टाका. यामुळे मनगट मऊ होते.


मनगटावर सतत घड्याळ बांधू नका.


सतत कुणाला तरी हात पकडू देऊ नका.

 

व्यायाम अवश्‍य करा…
हातांच्या मुठी वळून मनगटं जितकं फिरवता येईल तेवढं फिरवा.
हाताची बोटं जेवढी फाकवता येतील तेवढी फाकवा. असं केल्याने मनगटावरील तरालेल्या शिरा कमी होतात.
हाताची मूठ बांधा व उघडा. असं काही वेळा केल्याने मनगटातील रक्तप्रवाह वेगाने होतो व मनगट आकर्षक होतें.

लक्षात ठेवा….
मनगटावरील दागिने, बांगड्या वेशभूषेशी मॅचिंग असावेत.
गोल व मोठया मनगटात घट्ट, छोटया बांगड्या वा दागिने घालू नका. काही जणी बांगड्या लवकर फुटू नयेत म्हणून लहान बांगड्या घालतात. पण त्या मनगटावर सुंदर दिसत नाहीत.
खूप बारीक मनगट असताना मोठया सैल बांगडया वापरल्या तर वाईट दिसतात. शिवाय सतत बांगडया वाजतात व इतरांचं लक्ष विचलित होतं.

मनगट सुरेख नसेल तर मेंदीची नक्षी मनगटापर्यंत येऊ देऊ नका.
मनगटावरील घड्याळाचा पट्टा तुमच्या मनगटाला शोभून दिसणाराच असावा.
अशा प्रकारच्या छोटया छोटया गोष्टी जर तुम्ही नीट लक्षात ठेवल्या आणि मनगटाच्या सौंदर्याबाबत दक्ष राहिलात तर तुमच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल.

सुजाता गानू 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)