नागेवाडी येथे अपघातात एकजण ठार

सातारा-  पुणे-बेंगलोर महामार्गावर रविवारी दुपारी अपघात झाला. यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला.तर पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला.जखमीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

योगेश दत्तात्रय सणस असे मृत युवकाचे नाव आहे तर गणेश बबन सपकाळ असे जखमी युवकाचे नाव आहे. दोघेही कोरेगाव तालुक्‍यातील आसरे गावचे रहिवासी आहेत.

-Ads-

योगेश व गणेश हे महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी नागेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ आली असता ट्रकला पाठीमागून धडकली. यात योगेश याचा मृत्यू झाला तर गणेश जखमी झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)