नागालॅंड विधानसभा निवडणुकीवर प्रमुख राजकीय पक्षांचा बहिष्कार

कोहिमा – नागालॅंड विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटसह प्रमुख 11 राजकीय पक्षांनी घेतला आहे. निवडणुकीआधी नागा राजकीय समस्या सोडवली जावी, या आदिवासी आणि नागरी संघटनांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत राजकीय पक्षांनी हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आज येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कॉंग्रेस, भाजप, आप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नागालॅंड कॉंग्रेस आदी पक्षही निवडणुकीपासून दूर राहणार आहेत. नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी तिकीट वाटप केले जाणार नसल्याचे 11 राजकीय पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

नागालॅंडमधील राजकीय तोडगा किंवा नागा शांता करार निवडणुकीपेक्षाही महत्वाचा असल्याची राज्यातील जनतेची एकमुखी भूमिका आहे. त्यामुळे शांततेसाठी विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जावी, अशी मागणी या पक्षांनी केली आहे. नागालॅंडमध्ये आदिवासी आणि नागरी संघटनांनी सोल्युशन बिफोर इलेक्‍शन ही मोहीम हाती घेतली आहे. नागा शांतता करार प्रथम मार्गी लावावा. त्यानंतरच निवडणूक घेतली जावी, अशी या संघटनांची आग्रही भूमिका आहे. विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकली जावी, अशी मागणी नागा आदिवासींची सर्वोच्च संघटना असणाऱ्या नागा होहोने याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)