नागालॅंडलाही पावसाचा तडाखा …

12 जणांचा मृत्यू; हजारो नागरिक बेघर


300 ठिकाणी भूस्खलन

नागालॅंड – नागालॅंडमध्ये एका महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिला असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झो आहे. या पावसाचा फटका सुमारे 5 हजार 386 कुटुंब बसला असून ते बेघर झाले आहेत. यातील अनेक कुटुंबांनी मदत छावणीत आश्रय घेतला आहे. पाच हजार गावांना पावसाचा फटका बसला असून 300 ठिकाणी भूस्खलन झाले आहे.

पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री निम्फ्यू रिओ यांचे सचिव अभिषेक सिंह यांनी दिली आहे. भुस्खलनामुळे अनेक छोट्या राज्यांचा संपर्क तुटला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने भूस्खलन होण्याच्या घटना घडत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री निम्फ्यू रिओ यांनी 29 ऑगस्ट रोजी ट्‌विटरच्या माध्यमातून नागालॅंडला मदत करण्याचे आवाहन केले होते. नागालॅंडला तुमच्या मदतीची गरज आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. भूस्खलनामुळेही जनजीवन विस्कळीत झाले आहे, असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान नागालॅंडला अद्याप कोणतीही मदत मिळालेला नाही. 4 ते 7 सप्टेंबर दरम्यान अधिकारी भेट देणार असून त्यानंतर मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)