अवसरी- अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांना, तसेच कुपोषित मुलांना आणि अंगणवाडीतील एक ते सहा वयोगटांतील मुलांना, स्वच्छ-सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला भाजीपाला आहारात मिळावा यासाठी शासनाच्या आदेशानुसार लोकसहभागातून अंगणवाडी परसबाग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पात शेवगा, आळू, पालक, मेथी, कोथंबिर, भोपळा, फ्लावर, कोबी, राजमा अशा विविध भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. नागापूर येथील प्राथमिक शाळेच्या आवारात अंगणवाडीजवळच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत परसबाग प्रकल्पाचे उद्घाटन नागपूर गावचे सरपंच वैशाली पोहकर, उपसरपंच सुनील शिंदे यांनी केले. यावेळी बालविकास प्रकल्प अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका कविता पवार, सारिका पवार, वनिता गायकवाड,शोभा पोखरकर, कल्पना सातपुते, प्रमिला जुन्नरे, मनीषा भागवत, संगीता भोर, निर्मला दळे या सेविकांनी मदत आणि सहकार्य केले. नागापूर ग्रामपंचायतीने परसबाग बनविण्यासाठी विटांची आणि ट्रॅक्‍टरची व्यवस्था करून दिली. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)