“नागवडे’ कारखान्याचे शुक्रवारी बॉयलर अग्निप्रदिपन

तालुक्‍यातील अकरा किर्तनकारांना बॉयलर पुजेचा मान
श्रीगोंदा – “नागवडे’ साखर कारखान्याच्या सन 2018 – 19 या पंचेचाळीसाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ येत्या शुक्रवारी (दि.12) सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक व राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे नुकतेच निधन झाले.या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील अकरा किर्तनकारांच्या हस्ते बॉयलर पुजन करुन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने होणार असल्याचे मगर यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.12) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभात ह.भ.प. मधुकर महाराज वांगणे, ह.भ.प.सर्जेराव महाराज फराटे, ह.भ.प.ज्ञानदेव माऊली नलगे महाराज, ह.भ.प.ज्ञानदेव महाराज सुडके, ह.भ.प.अशोकशास्त्री शिंदे महाराज, ह.भ.प.संजय महाराज गिरमकर, ह.भ.प.जयसिंग महाराज इथापे, ह.भ.प.नामदेव महाराज पवार, ह.भ.प.एकनाथ महाराज कांडेकर, ह.भ.प.अनिल महाराज कवडे व ह.भ.प.भानुदास महाराज दातीर या किर्तनकारांच्या हस्ते बॉयलर पुजन केले जाणार आहे. तर कारखान्याचे संचालक अरुणराव पाचपुते व त्यांच्या पत्नी लताताई पाचपुते या उभयतांच्या हस्ते बॉयलरची विधीवत पुजा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला “नागवडे’ कारखान्याचे माजी संचालक, कुकडी कारखान्याचे आजी – माजी संचालक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, तालुका दुध संघ व श्रीगोंदा नगरपरिषदेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मगर यांनी दिली.
यावर्षीच्या हंगामात आठ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे “नागवडे’च्या व्यवस्थापनाचे उद्दीष्ट असून निश्चित उद्दीष्टपूर्ती होईल असा विश्वास व्यक्त करुन मगर म्हणाला की, कारखान्याच्या 26 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम प्रगतीत असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीचे संस्थापक शिवाजीराव नागवडे यांचे स्वप्न होते. त्यांची स्वप्नपूर्ती लवकरात लवकर करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाला ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, ऊस वाहतुकदार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष केशवराव मगर, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक व संचालक मंडळाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)