नागरी सहकारी बॅंकांचे योगदान मोलाचे

केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांचे प्रतिपादन
वाई, दि. 25 (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनने उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरी सहकारी बॅंकांचा गौरव करून नवीन पायंडा पाडला आहे. नागरी सहकारी बॅंका या थेट सामान्य जनतेची सेवा करीत असल्याने सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितिन गडकरी यांनी केले.
पुणे येथे आयोजित उत्कृष्ट नागरी सहकारी बॅंकांच्या गौरव कार्यक्रमांत ना. गडकरी बोलत होते. त्यांच्या हस्ते पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व आर्थिक सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या दि वाई अर्बन बॅंकेचा गौरव करण्यात आला. बॅंकेचे अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे यांनी ना. नितिन गडकरी यांच्या हस्ते पुरस्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक सीए. किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख होते.
दि वाई अर्बन बॅंकेस पुरस्कार मिळाल्याबद्दल ना. सुभाष देशमुख, भाजपचे पुण्यातील खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, वाई अर्बन परिवार पोपटलाल ओसवाल, अरूण देव, डॉ. सुधीर बोधे, अविनाश जोशी, बॅंकेचे संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, विवेक भोसले, सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका सौ. अजली शिवदे, सौ. गीता कोठावळे व वाईतील मान्यवरांनी बॅंकेचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)