नागरीकांना तीन महिन्यांची सुट…

मुंबई – प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात जारी केलेली प्लॅस्टिक बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली. प्लॅस्टिक बंदीनंतर राज्य सरकारने नव्याने अधिसुचना काढून तीन महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानुसार ग्राहक, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी तीन महिन्यांत त्यांच्याजवळ असलेला प्लॅस्टिकचा साठा प्रशासनाकडे जमा करावा.

तसेच प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीसंबंधी योग्य व्यवस्था नसताना नागरिक महिनाभरात त्यांच्याकडील प्लॅस्टिकची विल्हेवाट लावू शकत नसल्याने या कालावधीत प्लॅस्टिकची उत्पादनांचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तूर्त कारवाई करून नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)