नागरीकत्वाच्या यादीत नाव नसले तरी मतदान करता येणार

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली – आसामातील ज्या नागरीकांचे नाव अधिकृत नागरीकांच्या यादीत नाही पण ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशी मतदारांना मतदान करता येईल त्यांच्या त्या अधिकाराच्या स्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी रावत यांनी दिली. एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आसामातील चाळीस लाख लोकांना अधिकृत नागरीकांच्या यादीतून बाहेर वगळण्यात आल्यानंतर त्यावरून सध्या मोठेच वादंग माजले आहे. या चाळीस लाख लोकांचे नागरीकत्वाचे अधिकार काढून घेतले जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या चाळीस लाख लोकांना सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येईल की नाही हाही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. त्या

संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी हा खुलासा केला. ते म्हणाले की आम्ही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सच्या यादीची वाट न पहाता येत्या जानेवारी महिन्यात मतदारांची यादी प्रसिद्ध करणार आहोत. त्यात ज्यांची नावे आहेत अशा सर्वांना मतदानाचा अधिकार दिला जाईल. एनआरसी रजिस्टर मध्ये नाव नाही म्हणून कोणाचाही मतदानाचा अधिकार डावलला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)