नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा

शिक्रापूर- सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत शिक्रापुरच्या सरपंच जयश्री भुजबळ यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात संत निरंकारी सत्संग यांच्या वतीने सद्‌गुरू बाबा हरिदेव सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना कांबळे, माजी सरपंच दत्तात्रय गिलबिले, ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे, रोहिणी गिलबिले, दिलीप कोठावळे, शिवसेना उपप्रमुख संगिता विकारे, संत निरंकारी सत्संग शिक्रापूर प्रमुख जयराम सावंत, सेवादल प्रमुख प्रदीप नावडे, उद्योजक भाऊसाहेब कापरे, दत्तात्रय भुजबळ, लक्ष्मण कळमकर, चक्रधर भुजबळ, वसंत पाटील, विठ्ठल नवगिरे, तुकाराम बेंडभर यांसह आदी सेवेकरी तसेच मान्यवर व ग्रामीण रुग्णालय शिक्रापूरचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जयराम सावंत म्हणाले की, संत निरंकारी सत्संगच्या वतीने संपूर्ण भारतात 264 आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. आम्ही शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयचा आमच्या सेवेकऱ्यांच्या मदतीने परिसर स्वच्छ करणार आहे. डॉ. अर्चना कांबळे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)