नागरिकांनी परस्पर वाद मिटवावेत

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

पारगाव शिंगवे – पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. नागरिकांनी गावातील भांडणे गावातच मिटवली पाहिजेत. त्यामुळे पोलीस अधिकारी व स्वत:चा वेळ वाचेल, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे पोलीस चौकीचे उद्‌घाटन दिलीप वळसे पाटील व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, काकासाहेब पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, मानसिंग पांचुनकर, दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप जाधव, साहय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, साहय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतात कष्ट करून मिळालेले पैसे ज्यावेळी चोरीला जातात त्यावेळी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आपल्या गावाची सुरक्षा करणे नागरिकांचे काम असून पोलीस व नागरिक एकत्र येऊन गुन्हेगारी रोखता येते, असे संदीप पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)