नागरिकांना संवादातून सुरक्षेचा कानमंत्र!

पिंपरी – गुन्ह्यांना आळा बसवायचा असेल तर नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आवाहन करत वाकड पोलिसांनी विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी एकत्र बैठक घेत संवाद साधला.

पोलीस आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे, बालाजी सोसायटीचे बिजू बिलाई, प्रमुख वक्ते शरद श्रीवास्तव, रॉनी चौधरी, संतोष शर्मा आदी उपस्थित होते.

-Ads-

शरद श्रीवास्तव म्हणाले की, सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी वेगळे कायदे आहेत. त्या कायद्यांचे पालन संबंधीत कंपन्यांनी करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा रक्षकाची संबंधीत सोसायटीने सर्व कागदोपत्री माहिती घेणे गरजेचे आहे. त्याला सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा कायदेशीर पुरावा त्याच्याकडे आहे का हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. संबंधीत सुरक्षा कंपनी किंवा सुरक्षा रक्षकावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नसावा याबाबतची माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ऋषिकांत चिपाडे म्हणाले की, हिंजवडी व वाकड भागातून आगीचे सर्वाधिक “फॉल्स कॉल’ येतात ते आमच्यासाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे नागरिक म्हणून सुरक्षा यंत्रणांना योग्य ती माहिती देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच तुमच्या सोसायटीमध्ये किंवा कार्यालयातील आग विझवण्याची जी यंत्रणा आहे ती कायम अद्यावत ठेवा, तसेच वीज यंत्रणेची ही वेळोवेळी दुरुस्ती करत रहा, आपत्कालीन काळात शक्‍यतो लिफ्टचा वापर करु नका, लिफ्ट यंत्रणाही सोसायटींनी वेळोवेळी दुरुस्त करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. नम्रता पाटील यांनीही मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)