नागरिकांना एकाच वेळी मिळणार विविध सेवा

पिंपरी – विविध प्रकारच्या सेवा एकाच वेळी प्रदान करण्याची क्षमता असणारी प्रणाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. पहिल्यांदा कर संकलन विभागासाठी ही तांत्रिक प्रणाली उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये 25 इंग्रजी आणि 25 मराठी प्रश्‍न-उत्तरे तयार करून संगणक प्रणालीद्वारे नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे शक्‍य होणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिली.

नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागांची तसेच सरकारी, निमसरकारी विभागांची माहिती उपलब्ध होण्यासाठी तसेच तक्रारींची दखल घेण्यासाठी 15 ऑगस्ट 2013 पासून महापालिकेची “सारथी हेल्पलाईन’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत वेबसाईट, कॉल सेंटर, मोबाईल ऍप आणि पुस्तक स्वरूपात नागरिकांना विविध स्वरूपाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2016 पासून “सारथी हेल्पलाईन’ 24 तास कार्यरत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेसाठी व्हर्च्युअल असिस्टंट इम्प्लीमेंटेशन (आभासी सहायक कार्यान्वयन) प्रणाली राबविण्यासाठी 1 मार्च 2018 रोजी “ओरीओल’ या संथेकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. “ओरीओल’ हे “क्रीएटीव्ह व्हर्च्युल’ या कंपनीचे अंमलबजावणी भागीदार आहेत. 2003 मध्ये स्थापन झालेली “क्रीएटीव्ह व्हर्च्युअल’ ही कंपनी सरकारी, निमसरकारी, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, उद्योगांसाठी “ग्राहक सेवेसाठी स्वंय कार्यान्वित प्रणाली’ विकसित करणारी जागतिक कंपनी आहे.

-Ads-

ही संगणक प्रणाली कोणत्याही माहितीच्या गरजेसाठी चॅटबॅटकरिता 24 तास 365 दिवस उपलब्ध असते. विविध प्रकारच्या सेवा एकाच वेळी प्रदान करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. कोणत्याही संप्रेषण वाहिनीतून पोर्टल, मोबाईल ऍप, किऑस्क, सोशल मिडीया याद्वारे संवाद साधू शकतात. नैसर्गिक वार्तालाप अथवा परदेशी भाषिक नागरिकांशी सुलभतेने संवाद करण्याची विशेष तांत्रिक क्षमताही यात आहे. ही प्रणाली पूर्णत: नवीन स्वरूपाची आहे. त्यामुळे महापालिकेत प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्यासाठी प्रथमत: करसंकलन विभागासाठी तांत्रिक प्रणाली उपलब्ध करून 25 इंग्रजी आणि 25 मराठी प्रश्‍न-उत्तरे तयार करून संगणक प्रणालीद्वारे नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे शक्‍य होणार आहे.

साडेसहा लाखांचा खर्च
प्रायोगिक तत्वावर “ओरीओल’ या संस्थेमार्फत हा प्रकल्प राबवून तीन महिने कालावधीत संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील नऊ महिने कालावधीकरिता संगणक प्रणालीची देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्याकरिता एकत्रित 6 लाख 52 हजार रूपये अधिक जीएसटी इतका खर्च होणार आहे. हा खर्च “संगणक खरेदी व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ या लेखाशिर्षातून देण्यात येणार आहे. तसेच ही प्रणाली चालविण्यासाठी महापालिकेमार्फत आवश्‍यक सर्व्हर आणि इतर बाबींची पुर्तता करावी लागणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)