नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे रेल्वे अपघात 

गार्ड आणि ड्रायव्हरला क्‍लीन चिट

अमृतसर – अमृतसरमध्ये दसऱ्याला म्हणजेच 19 ऑक्‍टोबर रोजी रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या रेल्वे अपघातामुळे सगळा देश हादरला. या अपघातात 61 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्ड यांना क्‍लीन चिट देण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर उभे राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहणे हा नागरिकांचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा होता. त्यामुळे हा अपघात घडल्याचा निष्कर्ष रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त यांनी चौकशीनंतर काढला आहे.

यासंबंधीचा रेल्वे सुरक्षा आयुक्त पाठक यांनी अहवाल सादर केला. लोकांनी ट्रॅकवर उभे राहून रावण दहन कार्यक्रम पाहण्याचा निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे हा अपघात घडला असे, त्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काही शिफारसीही करण्यात आल्या आहेत.

19 ऑक्‍टोबरला संध्याकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी रावण दहन कार्यक्रम होता. लोक तो पाहण्यासाठी रुळांवर उभे होते. अपघात होऊ शकतो, दुर्घटना घडू शकते हा विचार लोकांनी करायला हवा होता. लोकांनी रावण दहन पाहण्यासाठी रुळांवर उभे राहणे हा त्यांचा हलगर्जीपणा होता, असेही अहवालात म्हटले आहे. या अहवालात अमृतसर अपघात प्रकरणात रेल्वेने ट्रेन ड्रायव्हर, गार्ड आणि इतर सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना क्‍लीन चिट दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)