नागरिकांच्या निष्काळजीपणाचा फटका

पुणे – वारंवार आवाहन करूनही वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व हा कचरा जाळण्याचे, पेटण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून वीजग्राहकांना सुद्धा खंडित वीजपुरवठ्याला नाहक सामोरे जावे लागत आहे.

बाणेर रोडवरील रामनदी पुलाच्या बाजूने लोखंडी ट्रेन्चमध्ये असलेल्या केबलवर टाकलेला कचरा पेटला. पुलावर लोखंडी जाळी लावली असली तरी त्यावरून नदीत कचरा टाकण्याच्या प्रयत्नात हा कचरा केबलवर पडत होता व साठलेल्या कचऱ्याला आग लागली. यात महावितरणच्या उच्चदाबाच्या तब्बल 6 वीजवाहिन्या जळाल्याने बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रोड परिसरातील सुमारे 35 हजार ग्राहकांचा सुमारे अडीच ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला व महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च सहन करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

…तर वीज खंडित होण्याचा धोका
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्‍स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडत आहेत. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे. अशा घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)