नारायणगाव- ग्रामपंचायत वारूळवाडी (ता. जुन्नर) ने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अत्याधुनिक डेंग्यू प्रतिबंधक फवारणी यंत्र घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य सुरू केले आहे.या यंत्राचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी पॅनेल प्रमुख संजय वारूळे, आशिष फुलसुंदर, जालिंदर कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष एम. डी. भुजबळ, ज्येष्ठ नागरिक रमेश पाटे, लक्ष्मण आबा मेहेर, गोपीनाथ मेहेर, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. मुळूक, सरपंच ज्योत्स्ना फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे, ग्रामपंचायत सदस्य जंगल कोल्हे, विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, परशुराम वारुळे, खुशाल काळे,ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, भाग्यश्री पाटे, अंजली संते, माया डोंगरे, सुनीता बटाव, सविता पारधी, जयश्री बनकर, मनाबाई भालेराव, वर्षा वऱ्हाडी, माजी उपसरपंच विजय वारुळे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डॉ. गुंजाळ म्हणाल्या की, ग्रामपंचायत वारूळवाडी अत्याधुनिक यंत्र घेतल्यामुळे वारूळवाडी गावाची धुरळणी सुमारे 2 ते 3 तासात पूर्ण होईल. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजाराचे प्रमाण कमी होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत वारूळवाडीचे विशेष आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा