नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेना विरोध करणार

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेकडून विरोध केला जाणार आहे. शिवसेनेचे पक्ष नेते संजय राउत यांनी एका निवेदनाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे. आसाममधील नागरिकांनी जात, धर्म आणि वंशाचा विचार न करता या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला आहे, असेही राउत यांनी सांगितले.

अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या घुसखोरांना धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याची तरतूद या दुरुस्ती विधेयकामध्ये असणार आहे. या विधेयकाची छाननी सध्या संसदेच्या संयुक्‍त समितीकडून केली जात आहे. उद्या,(7 जानेवारी) हे विधेयक संसदेमध्ये मांदले जाणार आहे.

या विधेयकामुळे आसाम कराराद्वारे आसामी नागरिकांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक सौहार्द जपण्याच्या प्रयत्नांना तडा जाईल, अशी शिवसेनेची भूमिका आहे. याशिवाय जर हे विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सचे कामच या निरर्थक ठरेल. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असतानाच शिवसेनेने भाजपविरोधातील आपली भूमिका आणखी एका मुद्दयावरून तीव्र विरोधी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)