नागराज मंजुळे यांना धक्का ; ‘झुंड’ मधून अमिताभ बच्चन यांची माघार

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. मंजुळे यांच्या बॉलिवूडमधील पहिल्या ‘झुंड’ या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली आहे. सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सैराट या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राजी केले होते. त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला. याचा परिणाम सिनेमाच्या शेड्युलवर पडत गेल्याने, सातत्याने तारखा पुढे पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रक बिघडले. बिग बींनी मागील वर्ष हे या सिनेमासाठी राखून ठेवले होते. मात्र ते वेळेनुसार झाले नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतला. नागराज मंजुळे यांच्या टीमसाठी हे निश्चितच धक्कादायक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)