नागरवस्ती विभागातील समुह संघटकांची पदे अद्याप रिक्‍तच

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून दुर्बल, महिला आणि मागासवर्गीय घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. योजनांचा लाभ देण्यावरून हा विभागावर ताशेरे ओढले जातात. मात्र, योजना लोकापर्यंत पोहचविण्यासाठी या विभागातील तीन समुहसंघटकांची पदे रिक्त आहेत. विभागाचा कारभार सुरळित चालविण्याची ही रिक्त पदे भरणे आवश्‍यक आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये महिला व बाल कल्याण, अपंग कल्याणकारी, मागासवर्गीय कल्याणकारी आणि इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. अर्थसहाय्य, अनुदानाच्या माध्यमातून थेट गोर-गरिब नागरिकांपर्यंत लाभ पोहचविण्याचे काम करावे लागते. परंतु, लाभार्थ्यांना वेळेवर लाभ देणे, गलथान कारभारामुले या विभागावर नगरसेवकांकडून ताशेरे ओढले जातात. त्याला या विभागातील अपुरे संख्याबळ ह देखील कारण आहे. या विभागात लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणे, योजनांची माहिती देणे, छाननी करणे, पात्र-अपात्र ठरविणे, प्रमाणित करण्याचे काम समाजसेवक करतात.

नागरवस्ती विभागासाठी समाजसेवक ही एकूण 4 पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी 3 पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, नागरवस्ती विभागाकडून सातत्याने ही पदे भरण्याची मागणी केली जात आहे. नुकतेच पालिका आयुक्तांनी महिलांसाठी समुपदेशन केंद्राची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिक्त समाजसेवक पदे भरणे आवश्‍यक असल्याची बाब नागरवस्ती विभागाने फेब्रुवारी 2018 मध्ये प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, नागरवस्ती विकास योजना विभागाचा कारभार सुरळित चालण्यासाठी ही 3 समाजसेवकाची पदे तातडीने भरावीत, असेही म्हटलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)