नागरगाव ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेला निधी

मांडवगण फराटा- नागरगाव (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगातून शाळेच्या भिंतीचे रंगकाम करण्यासाठी सुमारे 50 हजार रुपयांचा भरीव असा निधी शेलारमळा आणि जुने नागरगाव या दोन जिल्हा परिषद शाळांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन सरपंच मनिषा किसन शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचा समतोल राखून सर्व ठिकाणी विकास करण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे. या पुढील काळात सर्वांना योग्य न्याय देण्यात येईल. तसेच प्रलंबित रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य लोकांना ग्रामपंचायतीने मिळवून द्यावा, असे मत घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुदाम साठे यांनी मांडले.
ग्रामपंचायतीने विविध योजना शेलारवस्ती येथे राबवल्याबद्दल सुदाम साठे, रामभाऊ साठे, मनिषा शेलार यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीने वेळोवेळी कामांना प्राधान्य देऊन विविध विकासकामे केली आहेत. तरी भविष्यकाळात ही अशी कामे शेलारमळा या ठिकाणी होतील, असे सचिन शेलार यांनी आपल्या भाषणात सांगितले.
याप्रसंगी किसन शेलार, सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद साठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव शेलार, नागरगावचे माजी सरपंच शरद धुमाळ, मुख्याध्यापक श्‍यामराव जगताप, संदीप साठे, माजी उपसरपंच कमलाकर साठे, सतीश पवार, नागरगाव सोसायटीचे अध्यक्ष कानिफनाथ शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ साठे, अशोक खुळे आदी उपस्थित होते. सूञसंचालन माजी उपसरपंच सचिन शेलार यांनी केले. तर अजित शेलार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)