नागपूर-मुंबई दुरांतो एक्‍स्प्रेसचे 9 डबे रुळावरुन घसरले

संग्रहित छायाचित्र

कल्याण – नागपूर-मुंबई दुरांतो एक्‍स्प्रेसचे 9 डबे आज सकाळी रुळावरुन घसरले. आसनगाव-वाशिंददरम्यान हा अपघात झाला. यात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रेल्वेचे पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहे.

पावसामुळे रुळाखालील खडी वाहून गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूरहून मुंबईला येणारी दुरांतो एक्‍स्प्रेस सकाळी साडे सहाच्या सुमारास आसनगाव येथे पोहोचली. दरम्यान हा अपघात झाला. याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अपघातामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)