नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई –  नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सन 2018-19 च्या 1,759.71 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी देण्यात आली.

या वर्षात रिंग रोड जंक्शनवर लॉजिस्टिक पार्क उभारणे, विभागीय कार्यालयांची स्थापना, कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे, महानगर क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे, कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारणे, स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आदी प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

याचबरोबर फुटाळा तलाव परिसराचे सुशोभीकरण करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्यास मुदतवाढ देणे आदी विविध विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)