नागपूर बससेवा संप; १७ कर्मचारी बडतर्फ

नागपूर – आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी  नागपूर महापालिकेच्या  बस सेवेचे चालक आणि वाहक कालपासून संपावर आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, नागपूरकरांची गैरसोय होत आहे. दरम्यान  काल मेस्मा लागू झाल्यानंतर अनेक चालक आणि वाहक आज सकाळी डेपोत पोहोचले.मात्र जे वाहक आणि चालक अद्यापही संपावर ठाम आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करत त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

यामध्ये नागपूर महापालिका बससेवेच्या एकूण १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.दरम्यान नागपूर महापालिकेची बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आज सकाळी प्रशासन आणि पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. शहरातील यशवंत स्टेडियमजवळील डेपोमधून पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर काढल्या. मात्र भारतीय कामगार सेनेनं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. तसंच मेस्माविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)