नागपूर : कस्तुरचंद पार्क येथील विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल, मनपा नेते संदीप जोशी, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागपूर महानगरपालिका व सोलर इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्यातून येथील जनतेला ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून जॉगींग, वॉकींग, सायकल ट्रॅक, वृक्षलागवड, हिरवळनिर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कस्तुरचंद पार्क येथे आज मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जनसुविधांच्या कामाचे कोनशिला अनावरणही करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)