नागपूर अधिवेशनानंतर मुख्यमंत्री पुरंदर दौऱ्यावर

सासवड – विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर दौऱ्यावर येणार आहेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितल्याची माहिती नियोजन समितीचे सदस्य गिरीष जगताप यांनी दिली आहे.
पुरंदर भोर वेल्हा तालुक्‍याला वरदान असलेल्या गुंजवणी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री यांनी 1313 कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले आहेत म्हणून पुरंदर हवेलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बापट यांचा सत्कार केला. यावेळी सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष सचिन लंबाते, जीवन जाधव, सागर भूमकर, संजय निगडे, ऍड. दशरथ घोरपडे, साकेत जगताप, धनंजय कामथे, कैलास जगताप ,आनंद जगताप आणि नदीम इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत सासवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)