नागपूरातून आयएसआय एजंटला अटक

नागपूर– नागपूरातील “ब्रम्होस एरोस्पेस सेंटर’च्या परिसरातून सुरक्षा रक्षकांनी एका संशयित व्यक्‍तीला अटक केली आहे. हा संशयित पाकिस्तानी गुप्तहेर संघटना “आयएसआय’ आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेचा एजंट असल्याचा संशय आहे. “ब्रम्होस’ क्षेपणास्त्राशी संबंधित गोपनीय तांत्रिक माहिती तो या गुप्तहेर संघटनांना पुरवत होता. उत्तर प्रदेश “एटीएस’ आणि लष्करी गुप्तवार्ता विभागाने संयुक्‍तपणे कारवाई करून या संशयिताला अटक केली.

निशांत अगरवाल असे या संशयिताचे नाव असून नागपूरातील ब्रम्होस एरोस्पेस सेंटरमध्ये तो कार्यरत आहे. रविवारी रात्रीपासून त्याचा माग काढला जात होता. अखेर सोमवारी छापा घालून त्याला अटक करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. सरकारी गोपनीय कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.

ब्रम्होस एरोस्पेसचे केंद्र नागपूरजवळ आहे. भारत आणि रशियाच्या संयुक्‍त माध्यमातून ब्रम्होस क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे काम येथून चालते. गेल्या वर्षी ब्रम्होसच्या अद्ययावत क्षेपणास्त्रांची चाचणीही घेण्यात आली. अटक करण्यात आलेल्या हेराबाबत अधिकाऱ्यांकदून कोणतीही माहिती दिली जात नाही आहे. तसेच ब्रम्होस एरोस्पेसच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत मौन बाळगले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)