नागपूरातील महाराजबाग प्राणी संग्रहालय लवकरच बंद !

नागपूर – महाराजबाग प्राणीसंग्रहालय हे नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे, मात्र केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द केल्यानंतर आता महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द केली आहे. यामुळे नागपूराच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या या प्राणीसंग्रहालय रद्द करण्याच्या निर्णयाने निसर्गप्रेमी संतप्त झाले आहेत.

-Ads-

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्राणीसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याची कारणे सांगितली आहे. या प्राणीसंग्रहालयात बालोद्यान वेगळे केलेले नाही, कचरा व्यवस्थापन, तसेच संरक्षक भिंत नाही. मत्स्यालय आणि प्राण्यांच्या नोंदी बरोबर नाहीत, त्याचबरोबर प्राण्यांचे स्थानांतरण विना परवानगीने केले जातात. नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालय देशातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय म्हणून नुकतेच 25 वर्ष पूर्ण करणार होते, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराजबागेविषयी जिव्हाळा असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याचेही आवाहन निसर्गप्रेमीनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)