नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार विचारधीन

मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय
मुंबई – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तीन वरिष्ठ मंत्र्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळी अधिवेशन 4 जुलै रोजी सुरू होणार असून ते नागपूरला घ्यायचे की मुंबईतच याचा निर्णय ही समिती घेईल.

नागपूर कराराप्रमाणे वर्षातील एक अधिवेशन नागपुरात घेतले जाते. प्रथेप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. परंतु हे अधिवेशन दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ चालवले जात नाही. त्यामुळे नागपूरला हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन घ्यावे, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून होत होती. अखेर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत या दिशेने पहिले पाऊल टाकले.

गुरुवारी रात्री उशिरा जागलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यावे की मुंबईतच घ्यावे याबाबत विचार करुन अंतिम निर्णय घेण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. या समितीत स्वतः गिरीश बापट, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा समावेश आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांचे कामकाज खूप असते. त्यामुळे विदर्भातील प्रश्नांना फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळेच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा विचार असल्याचे बापट यांनी यांनी सांगितले. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या वेळी खरीपाचा हंगाम संपलेला असतो व कापूस व धानाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतो. सरकारवर पॅकेज, मदत जाहीर करण्यासाठी दबाव येतो. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरला उरकून घेण्याचा विचार काही वर्षांपूर्वी चर्चेला आला होता. ते ही यामागचे कारण असू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)