नागपूर – भिवापूर येथे एका ट्रकने दिलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्या. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.

शनिवारी सकाळी भिवापूरमधील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी सायकलवरुन घरी परतत होत्या. पाचही विद्यार्थिनी या अकरावी इयत्तेत शिकत होत्या. कॉलेज सुटल्यावर त्या घरी जात होत्या. नागपूर-गडचिरोली मार्गावरुन जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चौघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने काही वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली. टायर जाळून रास्ता रोकोही करण्यात आला. यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावरही दगडफेकीचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करुन जमावाला पांगवले. सध्या भिवापूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)