नागपूरमधील ‘त्या’ दुसऱ्या जुळ्या भावाचाही मृत्यू

नागपूर : क्रिकेट खेळताना हायटेंशन वायरमधून विजेचा शॉक लागलेल्या जुळ्या भावंडांपैकी दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसलेल्या एका भावाचा मृत्यू झाला होता. तर आता त्यातील दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.
मंगळवारी सकाळी 11 वर्षांच्या पियुष धरचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियांश धर याचा 8 जून रोजी मृत्यू झाला होता. 31 मे रोजी सुगतनगर मधील आरमोर्स कॉलनीत आपल्या रो हाऊसच्या बाल्कनीत प्रियांश आणि पियुष ही 11 वर्षांची जुळी भावंडे क्रिकेट खेळत होती. त्यावेळी झाडात अडकलेला प्लॅस्टिकचा बॉल काढताना दोन्ही भावांना विजेचा शॉक लागला होता. दोघेही भाऊ शॉकमुळे भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारा दिवसांपूर्वी एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या भावानेही प्राण सोडले आहेत. दरम्यान, या दोन्ही भावांच्या मृत्युस आता बिल्डर आणि महावितरणच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)