नागपूरचा पारा 45.9 अंशावर

नागपूर – शहरातील तापमानाची 45.9 अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेतून शहरवासीयांना कोणताच दिलासा मिळण्याची शक्‍यता नाही. गेल्या 4 दिवसांपासून शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी तर तापमानाने उच्चांक गाठत उच्चांकी 46.2 अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर उष्णतेची लाट कायम असून ती आगामी काही दिवस नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. सकाळपासूनच कडक उन्हाचा सामना नागपूरकरांना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)