नागपुरमध्ये तेलाच्या टाकीत पडून मजुराचा मृत्यू

नागपूर : जमिनीखाली असलेल्या दहा हजार लिटर क्षमतेच्या तेलाच्या टाकीत बुडून एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण सध्या मृत्यूशी  झुंज देत आहेत. नागपूरच्या कामठी रोड इथल्या नागलोक परिसरात ही घटना घडली आहे

गोवर्धन गॅस नावाच्या पेट्रोल केमिकल युनिटमधील आज दुपारची घटना आहे. हे तीन मजूर जमिनीखाली असलेली तेलाची टाकी साफ करण्यासाठी उतरवले होते. दहा हजार लिटर क्षमतेच्या टाकीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.

अत्यंत नाजूक अवस्थेत या मजुरांना बाहेर काढून तातडीने जवळच्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर एकाला मृत घोषित केले. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. टाकीत बुडल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसात तेल गेले. त्यामुळे त्यांच्या मेंदूला काही काळ ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)